Ad will apear here
Next
‘आयसीएआय’ पुणे शाखेची चार पारितोषिकांवर मोहर
नवी दिल्ली येथे महालेखापरीक्षक राजीव मेहर्षी यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया, चंद्रशेखर चितळे आदी मान्यवर

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेला २०१८ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर दोन, तर विभागीय पातळीवर दोन असे चार पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर ‘आयसीएआय पुणे’ला दुसरी सर्वोत्तम शाखा आणि सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा म्हणून पहिले पारितोषिक मिळाले, तर विभागीय पातळीवर आयसीएआय पुणे शाखा आणि विद्यार्थी शाखा दोघांनाही प्रथम पारितोषिक मिळाले.

दर वर्षी विविध शाखांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या मुख्य व विभागीय कार्यालयातून सर्वोत्तम शाखेचे पारितोषिक दिले जाते. राष्ट्रीय पातळीवरील यंदाच्या सर्वोत्तम दहा शाखांमध्ये पुणे शाखेने पात्रतेच्या निकषांप्रमाणे काम करत ९९ टक्के गुण संपादन केले व राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम शाखेचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले, तर विकासा या विद्यार्थी शाखेने १०० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. नुकताच नवी दिल्ली येथे हा पारितोषिक वितरण सोहळा भारताचे महालेखापरीक्षक राजीव मेहर्षी यांच्या हस्ते पार पडला.

याचबरोबर पुणे शाखेने आणि विद्यार्थी शाखेने विभागीय स्तरावरील (पश्चिम विभागामध्ये सुमारे ४० शाखा आहेत ) १०० टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. हा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. ही चारही पारितोषिके आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया (२०१८-१९) यांच्या नेतृत्वाखाली मिळाली आहेत. ५७ वर्षांच्या इतिहासात चार पारितोषिके मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे.

आनंद जाखोटिया म्हणाले, ‘या यशामध्ये शाखेचे पदाधिकारी कार्यकारी मंडळाचे सदस्य मुख्य कार्यालयाच्या कार्यकारणीचे सभासद पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सभासद, शाखेच्या उपमंडळाचे सदस्य, पुण्यातील सर्व लेखापरीक्षक, व्याख्याते, विद्यार्थी, शाखेमधील सेवक इत्यादीचा महत्वाचा वाटा आहे. सर्वांच्या सहकार्याने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन करणे शाखेला शक्य झाले आहे. ‘आयसीएआय’च्या देशभरात एकूण १६३ शाखा असून, पुणे शाखा राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शाखा आहे. या शाखेत आठ हजार सीए असून, २२ हजार सीए करणारे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अगरवाल यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language