Ad will apear here
Next
रिझर्व्ह बँकेची दिवाळी भेट; रेपो दरात पाव टक्का कपात
मुंबई : सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का कपात करून सर्वसामान्य ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे गृह आणि वाहन कर्जदरात घट होणार असून, कर्जाचा हप्ता कमी होणार असल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी, चार ऑक्टोबर रोजी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का (२५ आधारभूत अंक) कपात केली. 

हा दर आता ५.४० टक्क्यांवरून ५.१५ टक्के झाला आहे. २०१९ मधील ही सलग पाचवी दर कपात असून, २०१० नंतरचा हा सर्वात कमी रेपो दर आहे.

रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात कपात केली असून, तो  आता ४.९० टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा गृहबांधणी क्षेत्राला चांगला लाभ होणार आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi