Ad will apear here
Next
व्यसनमुक्तीविषयी जनजागृती अभियान
पुणे : '२६ जूनला असणाऱ्या जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त  तरुणाईत व्यसनमुक्तीविषयी जनजागृती निर्माण व्हावी म्हणून शहरात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
‘पोलीस अंमली पदार्थ विरोधी पथक, आनंदवन मानसोपचार केंद्र आणि समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर, बाबा शिर्के, हर्षल पंडित, जयंत हिरे हे उपस्थित होते.

‘उपक्रमांतर्गत २५ जून ते ६ जुलै दरम्यान पुण्यातील १० पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टी भागातील महानगरपालिकेच्या शाळांत जनजागृती केली जाईल. तसेच २६ जून रोजी पुण्यात दाखल होणाऱ्या पालखीचे औचित्य साधून पालखी सोहळ्यातही जनजागृती करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.   

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language