Ad will apear here
Next
आंबा बागेत हळद लागवडीचा प्रयोग यशस्वी
रत्नागिरी : पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश साळवी यांनी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील आंबा बागेत आंतरपीक म्हणून हळदीची लागवड केली होती. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून, त्यांनी ४०० किलो हळदीचे उत्पादन घेतले आहे.

या प्रयोगाबाबत माहिती देताना साळवी म्हणाले, ‘गेली दोन-तीन वर्षे गुहागर व रत्नागिरी तालुक्यात हळद लागवडीसाठी प्रयत्न करणारे माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर व आबलोली (ता. गुहागर) येथील हळदीची एसके-४ (स्पेशल कोकण-४) ही जात विकसित करणारे सचिन कारेकर  यांच्याबद्दल वृत्तपत्रांमधून वाचले होते. त्यामुळे आपल्यालाही आंबा बागेत हळद लागवडीचा प्रयोग करता येईल का, याबाबत पौनीकर यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार एसके-४ जातीची हळदीची एक महिन्याची ८०० रोपे गुहागर येथून पौनीकर यांच्याकडून आणली. जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लागवड केली.’

उत्पादित केलेल्या हळदीसह डावीकडून गजेंद्र पौनीकर, प्रकाश साळवी आणि सौ. साळवी.अधिक माहिती ते म्हणाले, ‘लागवड करताना सेंद्रीय खत ०.५०० किलो, सुफला ५० ग्रॅम प्रत्येक रोपांना घातले. थोडे फोरेट घालून लागवड पूर्ण केली. तीन-साडेतीन गुंठ्यात आंबा कलमांतील मोकळ्या जागेत लागवड केली. रोपे मोठी झाल्यानंतर कीड-रोगांपासून संरक्षण म्हणून क्लोरोपायरीफॉस व कार्बनडायझीम यांची एक फवारणी केली. ऑगस्ट महिन्यात मातीची भर घातली. पाऊस गेल्यानंतर पौनीकर यांच्या सुचनेप्रमाणे दोन-अडीच महिने हलके पाणी दिले. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात हळद काढली आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान वाटले.’

साळवी यांनी सुमारे १५० किलो कंद व २५० किलो ओली हळकुंड असे एकूण ४०० किलो हळदीचे उत्पादन घेतले असून, यासाठी गजेंद्र पौनीकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी एक रोप लावले तेथे एक किलो ४०० ग्रॅम, काही ठिकाणी दीड किलो, तर सर्वांत मोठा गड्डा एक किलो ७०० ग्रॅम एवढा मोठ्ठा आहे.

दरम्यान, आता उत्पादित केलेल्या हळदीचे कंद लागवड करून यावर्षी लागवडीचे क्षेत्र वाढवणार असल्याचे साळवी यांनी सांगितले. ‘ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी आंबा बागेतील हळद लागवडीचा हा प्रयोग अवश्य करावा,’ असे आवाहनही साळवी यांनी केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language