Ad will apear here
Next
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कार
पुणे : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ‘राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन’तर्फे शिष्यवृत्ती व पुरस्कारांचे वितरण  करण्यात येणार आहे. 

शनिवार, २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जवाहरलाल नेहरू सभागृह येथे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे प्राचार्य भाऊसाहेब जाधव, ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा होणार आहे.

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी, खेळाडू यांना शिष्यवृत्ती देण्यात येते, तर विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.
 
या वर्षी सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी संत साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करणारे अजय महाराज बारस्कर, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जाधव आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रासाठी गिनीज बुकमध्ये नाव नोंदवणारा कोल्हापूरचा स्केटिंगपटू समर्थ पांढरबळे, अवयवदान क्षेत्रासाठी जनजागृतीचे काम करणाऱ्या कोमल पवार घाटगे, पत्रकारितेतील योगदानासाठी पुण्यनगरीचे उपसंपादक शिरीष रणदिवे, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी जिल्हा परिषदेच्या टाकळी भीमा शाळेतील शिक्षक संजय गायकवाड, कला व अभिनय क्षेत्रासाठी अभिनेता योगेश तनपुरे यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

गडकोट, किल्ले संवर्धनासाठी प्रसाद दांगट व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. साहसी खेळाडूचा विशेष पुरस्कार मल्लखांब क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अंशुमन धावडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या विविध सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेणारे  लहू पडवळ, धोंडीबा घारे, संदीप खाटपे, तानाजी चिकणे यांना परिवर्तन दूत पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language