Ad will apear here
Next
साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सहा कोटींचे सिटी स्‍कॅन मशीन


शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये सुमारे ६.५३ कोटी रुपये किंमतीच्‍या नवीन अत्‍याधुनिक १२८ स्लाइस सिटी स्‍कॅन मशीनचे उद्घाटन संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

या प्रसंगी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त भाऊसाहे‍ब वाकचौरे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा योगिता शेळके, नलिनी हावरे, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, वैद्यकीय अधीक्षिका मैथिली पितांबरे, डॉ. प्रीतम वडगावे, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, दिलीप उगले व रेडिओलॉजिस्ट डॉ. व्‍यवहारे आदी मान्‍यवर उपस्थित होते.

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये जुने ६४ स्‍लाइस सिटी स्‍कॅन मशीन बदलून त्‍याजागी सुमारे सहा कोटी ५३ लाख २९ हजार ३९७ रुपये किंमतीचे अत्‍याधुनिक असे विप्रो जीई कंपनीचे १२८ स्‍लाइस सिटी स्‍कॅन मशिन बसविण्‍यात आले असून, त्‍याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. हे मशीन अहमदनगर जिल्‍ह्यातील सर्वात अद्ययावत आणि पूर्वीच्या मशीनपेक्षा जास्‍त वेगवान व नवीन तंत्रज्ञान प्रणाली असलेले मशीन आहे. या मशीनद्वारे जुन्‍या दरातच तपासणी केली जाणार असून, हे मशीन हृदयाच्‍या कॉरोनरी अॅंजिओग्राफी तपासणीसाठी अधिक उपयोगी ठरणार आहे.‘श्री साईबाबा व श्री साईनाथ या रुग्‍णालयासाठी मागील एका वर्षात १२७ मशिनरी खरेदी करण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा पुरवठा आदेश देण्‍यात आलेला आहे. आजपर्यंत ९० विविध मशिनरी बसविण्‍यात आलेल्‍या आहेत. यामध्‍ये कॅथलॅब, सिटी स्‍कॅन, कलर डॉप्‍लर, डायलेसिश, एक्‍सरे, ओटी टेबल, म‍ल्‍टीपॅरा मॉनिटर आदींचा समावेश आहे. नवीन एमआरआय मशीन १५ डिसेंबर २०१८ रोजी सुरू करण्‍यात येईल. उर्वरित मशीन येत्‍या दोन महिन्‍यांत कार्यन्वित होतील. गेल्‍या १५ वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अत्‍याधुनिक मशिनरी संस्‍थानच्‍या या दोन्‍ही हॉस्पिटलमध्‍ये बसविण्‍यात येत आहेत,’ अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

(Please click here to read this news in English.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language