Ad will apear here
Next
‘तेरे नाम’च्या सिक्वेलमध्ये नसेल सलमान..
कॅमिओ भूमिकेत दिसण्याची शक्यता

मुंबई : २००३मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा चित्रपट सलमानच्या अभिनयाला चार चाँद लावणारा ठरला. प्रेक्षकांनी या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी ‘तेरे नाम’च्या सिक्वेलवर काम करत असल्याचे म्हटले आहे. परंतु अभिनेता सलमान खान चित्रपटात भूमिका साकारणार नसून तो कॅमिओ रोलमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘तेरे नाम’ हा चित्रपट सलमान खानच्या आजवरच्या चित्रपटांपैकी महत्त्वाचा चित्रपट समजला जातो. इतर चित्रपटांपैकी या चित्रपटात त्याने केलेली भूमिका विशेष पसंत केली गेली. चित्रपटातील गाणी आजही ऐकली जातात. इतकेच नाही, तर या चित्रपटाला अनेक पातळ्यांवर पुरस्कारही मिळाले. अशा चित्रपटाचा सिक्वेल करण्याबाबच्या वृत्ताला सतीश कौशिक यांनी दुजोरा दिला आहे. 

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार सतीश कौशिक सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करत असून चित्रपटाची स्क्रीप्ट पूर्ण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र सध्या ‘कागज’ या त्यांच्या आगामी चित्रपटात ते व्यग्र असून त्यानंतर या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही सतीश कौशिकच करणार असून तब्बल १६ वर्षांनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दरम्यान या चित्रपटासाठी सलमान खानला विचारण्यात आले होते, असे कौशिक यांनी सांगितले. परंतु सलमानने चित्रपटासाठी नकार दिल्यानंतर इतर दोन कलाकार घेऊन हा चित्रपट करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी सलमान चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसण्याबाबत चर्चा ऐकायला मिळत आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language