Ad will apear here
Next
फाइव्ह-जी तंत्रज्ञानाने संवाद व्यवहार बदलणार : डॉ. पारिजात
शिक्षक दिनानिमित्त पत्रकारिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र पारिजात.कोल्हापूर : ‘देशात येऊ घातलेल्या फाइव्ह-जी तंत्रज्ञानामुळे मानवी संवाद व्यवहार बदलणार आहे,’ असे प्रतिपादन सहयोगी प्राध्यापक डॉ. राजेंद्र पारिजात यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागात शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘फाइव्ह- जी तंत्रज्ञानाचे स्वरूप’ या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार होत्या.

डॉ. पारिजात म्हणाले, ‘फाइव्ह-जीमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. येणारा काळ डेटाचा असेल. सांख्यिकी माहितीवर लोकांचा विश्वा्स चटकन बसतो. त्यामुळे यापुढील काळात पत्रकारितेतही डेटा जर्नालिझमला विशेष महत्त्व येणार आहे. माहिती पाठवण्याची गतीही फाइव्ह-जीमुळे कमालीची वाढणार आहे. मोबाइलद्वारे सर्व संवाद व्यवहार गतीने होतील. यापुढच्या काळात मोबाइल हाच संवाद व्यवहाराच्या केंद्रस्थानी असेल. संकल्पनांना दृश्य रूप देण्यासाठीही मोठ्या प्रमाणात फाइव्ह-जीचा उपयोग होणार आहे. सध्याचा काळ नवनव्या संकल्पनांचा आहे. या संकल्पना फाइव्ह-जीमुळे अधिक विकसित होतील. कामामध्ये स्मार्टनेस येईल. परंतु याचे काही दुष्परिणामही संभवतात. परंतु, तंत्रज्ञान कसे हाताळले जाते, यावर त्याचा फायदा होईल की तोटा हे अवलंबून राहते.’

या वेळी माजी विद्यार्थी दत्ता थोरे, मारुती कंदले, धर्मवीर पाटील यांनी मनोगत व्यक्त. केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. या वेळी डॉ. सुमेधा साळुंखे, सचिन दिवाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language