Ad will apear here
Next
सोलापुरात शालेय विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वितरण


सोलापूर :
प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला आळा बसण्यासाठी सोलापुरात शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कापडी पिशव्या वितरित करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या मुलांच्या मराठी शाळेत हा कार्यक्रम झाला. 

कापडी पिशव्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीने सोलापूर जिल्ह्यात तीस हजार कापडी पिशव्यांच्या वितरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. त्यातून महिला आर्थिक विकास महामंडळाने बचत गटांच्या माध्यमातून या पिशव्या तयार करून घेतल्या. या पिशव्या शालेय विद्यार्थी, महिला बचत गटांच्या सदस्या, तसेच अन्य महिलांना वितरित करण्यात येणार असल्याचे महिला आर्थिक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ लामगुंडे यांनी सांगितले.

क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश भारती आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भगवान मुंढे, गीता ढाकणे, धोंडू भेगाले, संध्या वीर, रंजना गायकवाड, अश्विनी जवळगे, ज्योती साळुंखे, रामेश्वरी बेरूणगी, विद्या राऊत, रंजना कसबे, अर्चना गोचडे, यशोदा वाघमारे संजीवन मालतूमकर यांनी केले.

हेही जरूर वाचा :


 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi