Ad will apear here
Next
समतानगर, बोरीवली व डोहोळे पाडा शाळेत योगदिन साजरा

पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघा केंद्रातील समतानगर, बोरीवली व कोशिंबी केंद्रातील डोहोळे पाडा या जिल्हा परिषद शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

योग दिनानिमित्त प्रशिक्षण कार्यशाळा, आसने, प्रात्यक्षिके आदी उपक्रम घेण्यात आले. या दरम्यान डोहोळे पाडा शाळेचे सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी योगाचे महत्त्व, योग दिन का साजरा केला जातो, तसेच योगाचे फायदे व प्रकार आदींविषयी माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनिता बेलकडे, डोहोळे ग्रुप ग्रामपंचायत सदस्या मंजुळा वाघे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मीरा जाधव, सदस्य अशोक म्हसकर, इंदिरा वाघे आणि पालक उपस्थित होते. 


पडघा केंद्रातील समतानगर जिल्हा परिषद शाळेतही योगदिन साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, सहशिक्षिका भावना घरत यांनी योगाचे प्रात्यक्षिके दाखवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language