Ad will apear here
Next
‘जीजीपीएस’मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेतर्फे (जीजीपीएस) दहावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात ‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के लागला. यात ४० विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले, तर आत्ताच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतही पाचवीचे १२ आणि आठवीचे १२ विद्यार्थी जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत चमकले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर

या वेळी कार्याध्यक्षा पटवर्धन यांच्यासह कार्यवाह सतीश शेवडे आणि सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले; तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, प्राथमिक विभागप्रमुख विजया पवार, गुरुकुल विभागप्रमुख किरण जोशी, यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.   
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language