Ad will apear here
Next
मेंढापूर शाळा व्यवस्थापन समितीचा आदर्श
पदाधिकाऱ्यांनी स्वतः देणगी काढत शाळेला दिल्या भौतिक सुविधा
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने शाळेच्या नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी स्वतः देणगी काढत २४ हजार रुपयांचा निधी गोळा केला. या निधीतून त्यांनी शाळेला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पाऊल उचलत त्यांनी इतर शाळा व्यवस्थापन समित्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

मेंढापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नव्याने नेमणूक झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष महादेव नागणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत प्रभारी मुख्याध्यापक देविदास नगरे यांनी शाळेत भौतिक सुविधा नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. याची तत्काळ दखल घेऊन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतर सदस्यांनी शाळेसाठी जमेल तशी देणगी देत खारीचा वाटा उचलला. अध्यक्ष नागणे यांनी पाच हजार रूपये, सचिन पवार, कमल शिंदे, जयंत पवार व पांडुरंग पवार यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये, तर सुनील पवार, शिवाजी नागणे, आशा आयरे, नरहरी पवार, रावसाहेब पवार, राजेश गोरे, राजेंद्र मखर, अनिल गुरव, हणमंत पाटोळे, केशव पवार, बबन पाटील या सदस्यांनी प्रत्येकी एक हजार रुपये दिले. यातून २४ हजारांचा निधी गोळा झाला.

जमा झालेल्या या रक्कमेतून शाळेला कचरा कुंड्या, बकेट कांगारू, साउंड सिस्टीम व ईन्व्हटर बॅटरी खरेदी केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच मासिक बैठकीत शाळेला या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापक नगरे यांनी त्यांचे आभार मानले; तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीचे अश्वासन दिले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language