Ad will apear here
Next
...अन् झंकारला स्वरमंच!
मधुकर धुमाळपुणे : गेली ६५ वर्षे रसिक आणि दर्दी कानसेनांना मंत्रमुग्ध करणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव बुधवारी, १३ डिसेंबर रोजी सुरू झाला. मधुकर धुमाळ यांनी आपल्या सनईवादनाने स्वरमंच झंकारत महोत्सवाची सुरुवात केली. सनईवर भीमपलास राग आळवीत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना भरत कामत यांनी तबल्यावर, तर विजय देबलँसी यांनी शहनाई वाजवीत साथ दिली.

त्यानंतर डॉ. विजय राजपूत यांचं स्वरमंचावर आगमन झालं. त्यांनी पूरिया कल्याण राग आळविला. त्यांनी सादर केलेल्या ‘मोरे कान्हा जो आए पलटके’ या पिलू रागातील ‘होरी’ने विशेष दाद मिळवली. अविनाश दिघे (हार्मोनियम), रवींद्रकुमार सोहोनी (तबला), प्रो. डेव्हिड क्लार्क (तानपुरा व गायन), सुनील रावत (तानपुरा), वसंत गरुड (टाळ) यांनी त्यांना साथसंगत केली. ‘रघुवर तुमको मेरी लाज’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.

देबाशिष भट्टाचार्यराजपूत यांच्यानंतर स्वरमंचावर देबाशिष भट्टाचार्य यांचं आगमन झालं. सतार, सरोद, सारंगी आणि गिटार या चार वाद्यांचा मिलाफ असलेल्या त्यांच्या बहारदार चतुरंगीचे सूर त्यांनी छेडले व रसिकांची मने जिंकली. त्यांना तबल्यावर साथ देत होते शुभाशीष भट्टाचार्य. अखिलेश गुंदेचा यांनी पखवाज वाजवून साथ दिली. साधारण २२ ते २४ तारा असलेल्या या वाद्याचे वजन सहा किलोपर्यंत असते. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बाजे मुरली बाजे’ हे भजन वाजवून त्यांनी आपल्या सादरीकरणास पूर्णविराम दिला.

त्यानंतर बनारस घराण्याचे पंडित राजन व साजन मिश्रा यांनी पूरिया राग आळवून आपल्या सादरीकरणास सुरुवात केली. ‘मैं तो करी आई पिया संग रंग रलिया’ ही रचना त्यांनी विलंबित एकतालात सादर केली. राग सोहोनीमध्ये ‘आई ऋतू नवेली’ ही रचनाही सादर केली. ‘जगत में झूठी देखी प्रीत’ या भजनाने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना डॉ. अरविंद थत्ते (संवादिनी), शांतिलाल शहा (तबला), विनय चित्राव (तानपुरा) आणि सुहास ओढे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

पंडित हरिप्रसाद चौरसियापहिल्या दिवसाचा समारोप पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरी वादनाने झाला. पं. विजय घाटे (तबला), पं. भवानी शंकर (पखावज), देवप्रिया आणि सौरभ वर्तक (बासरी) यांनी त्यांना साथसंगत केली. सादरीकरणाच्या शेवटी आरती वाजवून त्यांनी सर्व रसिकांनादेखील ताल धरत टाळ्या वाजविण्यास भाग पाडले. याच वेळेस त्यांच्या फोटोंच्या थीम कॅलेंडरचेदेखील अनावरण करण्यात आले. त्यावर मिश्किल टिप्पणी करताना पंडितजी म्हणाले, ‘या फोटोंमध्ये तर मी एखाद्या लहान मुलासारखा आणि सुंदर देखील दिसतो आहे.’ त्यांनी बिहाग व पहाडी हे राग ऐकवले.

यंदा आर्य संगीत प्रसारक मंडळ या आयोजक संस्थेला तंबोऱ्याच्या चार जोड्या भेट म्हणून देण्यात आल्या. बाळासाहेब मिरजकर व साजिद युसूफ मिरजकर यांची कलाकृती असलेले हे आठ तंबोरे सर्व रसिकांसमक्ष श्रीनिवास जोशी यांनी मंडळाच्या वतीने स्वीकारले. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांवर अब्दुल करीम खाँसाहेब, सवाई गंधर्व व भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या सोन्याच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत. याबाबत बोलताना मिराजकर म्हणाले, ‘गेले एक वर्ष आम्ही यांवर काम करत आहोत. यासाठी ‘रेड सिडार’ म्हणजेच तून नावाच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे. यासाठी वापरण्यात आलेले भोपळे मंगळवेढा येथून मागविण्यात आले आहेत. याची संपूर्ण कारागिरी आम्ही केली असून, डिझाइनचे काम पुण्यात केले आहे.’

शिवाय याला देण्यात आलेले रंगदेखील संपूर्णपणे नैसर्गिक आहेत. ‘फुलांपासून बनविलेल्या या रंगांमुळे वाद्यातून येणाऱ्या आवाजात किंवा व्हायब्रेशनमध्ये कोणताही बदल होत नाही. त्याचा नैसर्गिकपणा तसाच टिकून राहावा यासाठीच या रंगांचा वापर केला आहे,’ असे ओंकार इनामदार यांनी या रंगांबाबत सांगितले.

(सवई गंधर्व महोत्सवाचे व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language