Ad will apear here
Next
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक
सेन्सेक्सने पार केला ४० हजारांचा टप्पा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, भाजप आघाडीवर असल्याचे कल दिसू लागताच, भारतीय शेअर बाजारानेही उसळी घेतली आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ऐतिहासिक ४० हजारांचा टप्पा पार केला. गुरुवारी, २१ मे रोजी, सकाळी शेअर बाजार सुरू होताच, सुरुवातीच्या १५ मिनिटांतच सेन्सेक्सने तब्बल एक हजार १४ अंकांनी उसळी घेऊन ४० हजार १२४ अंकांचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकानेही ३०३ अंकांची झेप घेत ऐतिहासिक १२ हजारांचा टप्पा पार करत १२ हजार ४१ अंकांवर पोहोचला. 


त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीत चढ-उतार सुरू असून, आतापर्यंत सेन्सेक्स ४० हजारांवरून खाली येत ३९ हजार २८१ अंकांवर, तर निफ्टी ५६ अंकांनी घसरून ११ हजार ७९३ अंकांवर पोहोचला आहे. 

(निवडणूक निकालांचे अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language