Ad will apear here
Next
‘बीएनसीए’मध्ये बागरचना व विकास अभ्यासक्रमाचे आयोजन
पुणे : कला व शास्त्र असणार्‍या बाग रचनाशास्त्राचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनतर्फे  (बीएनसीए) २९ जुलै ते नऊ ऑगस्ट २०१९ या दरम्यान आयोजित केला आहे. 

बारा दिवसांच्या या अभ्यासक्रमात गृहिणी, नर्सरीचे मालक, कार्पोरेट क्षेत्रातील व कृषी क्षेत्रातील इच्छुक, अंतर्गत सजावट करणारे इंटिरियर डिझायनर, वास्तूरचनाकार आणि विविध व्यावसायिकांनाही सहभागी होता येणार आहे. यातील सहभागींना स्वहस्ते बाग तयार करण्याची, तसेच बागेची देखभाल करण्यासंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या अभ्यासक्रमात बागेचे लॅंडस्केप (भूपृष्ठ कला) साकारण्यात ग्राफिक्सचा (आरेखन) वापर, रोपांच्या गरजा, बिया पेरण्याच्या पद्धती, एकीकडून दुसरीकडे झाडे लावण्याचे तंत्र, पालेभाजी उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, पाणवनस्पती उद्यान, गच्चीवरील उद्यान, व्हर्टीकल किंवा उभ्या आकारचे उद्यान, झाडे-झुडपे, वेली आणि हिरवळी, मोसमी फुले, निवडूंग व इतर पाणी धरून ठेवणार्‍या झाडांचे प्रकार, बांडगुळांच्या जाती, कीटकनाशकांचा योग्य वापर, बागेतील पायवाटा आणि बसण्याच्या जागा, गच्चीवरील बाग, बाटल्यांमधील झाडे, जल संचयाच्या जागा, तळी आणि कारंजी आदींचा समावेश आहे. या शिवाय अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके, विविध बागांना भेटी व कार्यानुभव यांचा समावेश आहे. 

हा अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून शिकवला जाणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा असून, शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : अनुपमा खटावकर- ९४२३० १३९८३ 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language