Ad will apear here
Next
‘दिवा पेजंट्स’च्या सौंदर्य स्पर्धेत डालिया दत्ता उपविजेत्या; रचना गुप्ता ‘स्टाइल आयकॉन’
डालिया दत्ता व रचना गुप्ता

पुणे : ‘दिवा पेजंट्स’च्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांनी आयोजित केलेल्या ‘मिसेस इंडिया-एम्प्रेस ऑफ द नेशन’ सौंदर्य स्पर्धेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या डालिया दत्ता यांनी उपविजेतेपद पटकावले, तर ख्यातनाम इंटेरिअर डिझायनर रचना गुप्ता यांनी ‘स्टाइल आयकॉन’चा मान मिळवला. 

ही सौंदर्य स्पर्धा पुण्यातील हयात हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. अंतिम फेरीसाठी देशभरातून ४२ महिला स्पर्धकांची निवड झाली होती. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेता अश्मित पटेल, मुग्धा गोडसे, अदिती गोवित्रीकर, कार्ल मस्कारेन्हास, पिया पावानी, गौरांगी श्रावत, सिमरन गोधवानी, कमल शर्मा व डॉ. रचना शर्मा यांनी काम पाहिले. 

‘मिसेस इंडिया-एम्प्रेस ऑफ द नेशन’ सौंदर्य स्पर्धेतील उपविजेत्या डालिया दत्ता
डालिया दत्ता या पुण्यातील ई-झेस्ट सोल्यूशन्स लिमिटेड या बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीत की अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत असून, त्यांनी कथक, तसेच साल्सा व बाशाटा नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना गायन, पाककला यासह भ्रमंतीचीही आवड आहे. या सौंदर्य स्पर्धेतील यशाचे श्रेय त्यांनी आपला साडेतीन वर्षांचा मुलगा रोनिल, पती लिजो वर्गीस, बहीण तुली दत्ता, नणंद लिजी वर्गीस व मित्रपरिवाराला दिले. 

त्या म्हणाल्या, ‘सौंदर्य स्पर्धेतील विजेतेपदापर्यंतचा माझा प्रवास तितकासा सोपा नव्हता. घरात लहान मूल आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी, तसेच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना तारेवरची कसरत करावी लागत असे. स्पर्धेची तयारी करताना अवघी तीन तास झोप मिळायची. आपण आपल्या स्वप्नाला न्याय देऊ शकत नाही, की प्रियजनांना, या निराशेने मी अनेकदा कोलमडून पडले; पण मी त्यातूनही उठून मार्ग कायम ठेवला आणि हे यश मिळवले.’

‘माझे ध्येय आता इतर महिलांना त्यांच्या कोशातून बाहेर काढून त्यांची स्वप्ने जगायला लावण्यासाठी प्रेरणा देण्याचे आहे. एखादी महिला इतर महिलांमध्ये ताकद निर्माण करते तेव्हा ते खरे सक्षमीकरण असते, असे मला वाटते,’ अशा शब्दांत डालिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘मिसेस स्टाईल आयकॉन’ रचना गुप्ता
या स्पर्धेत ‘मिसेस स्टाईल आयकॉन’चा बहुमान मिळवणाऱ्या रचना गुप्ता या इंटेरिअर डिझायनर आणि होम डिझाईन कन्सल्टंट असून, स्वतःच्या होम व्ह्यू व क्रिएटिव्ह इंडिया या दोन कंपन्या आणि एक फर्निशिंग स्टोअरही चालवतात. त्या दोन किशोरवयीन मुलांच्या आई आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षी वैधव्य आल्यानंतर अत्यंत धैर्याने त्यांनी अनेक आव्हानांना तोंड देत, आजचे यश मिळवले आहे. 

या स्पर्धेतील यशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ‘कुणी आपल्यावर लिंबू फेकून मारत असेल, तर एक बरणी घ्या आणि त्या लिंबाचे सरबत बनवा. हेच माझे तत्त्व आहे. मी दोन किशोरवयीन मुलांची आनंदी आई असून, मला माझ्या भूमिकेचा अभिमान आहे. एकाचवेळी काम सांभाळणे, दोन तरुण मुलांचे संगोपन करणे आणि घराची आघाडी या गोष्टी एकटीने सांभाळणे, ही खडतर लढाई होती; पण त्यामुळे माझी वाटचाल मंदावली नाही किंवा जीवन व साहसाप्रतीचा माझा उत्साहही निस्तेज झाला नाही. मला प्रवासाची, तसेच शर्यतीत वाहन चालवण्याची आणि पदभ्रमणाची आवड आहे. या स्पर्धेत भाग घेणे हा माझ्या जीवनातील सर्वांत आव्हानात्मक क्षण होता. माझी आई व मुलगी यांनी मला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांचा पाठिंबा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळे मला माझ्यातील सामर्थ्य व क्षमता आजमावून पाहता आल्या. यापुढे आंतरराष्ट्रीय मंचावर स्पर्धेत सहभागी होण्याची आकांक्षा आहे.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi