Ad will apear here
Next
महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचाराला सुरुवात
मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून मतदारांशी संवाद


मुंबई : उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून शिवसेना-भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून मनोज कोटक यांनी धडाक्यात प्रचाराला सुरूवात केली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी विविध उद्यानांना भेटी देत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मतदारांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या हेदेखील प्रचारात सहभागी झाले होते.



चार एप्रिलला सकाळी प्रतापसिंह उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना सुखद धक्का बसला. सकाळच्या वेळी या उद्यानाला महायुतीचे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भेट देत मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर मदर टेरेसा उद्यानातही त्यांनी नागरिकांशीही विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या संवादादरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी कोटक यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले; तसेच केंद्र आणि राज्यात ‘भाजप’च्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामगिरीबाबतही अनेकांनी समाधान व्यक्त केले.



या वेळी बोलताना कोटक म्हणाले, ‘या मतदारसंघात आमचे मोठे काम आहे. या मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले माजी खासदार किरीट सोमय्यांनी ही चांगले काम केले आहे. त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद पहायला मिळत आहे. या शिवाय नेहमीच या मतदारसंघात मतदारांचा आम्हाला पाठिंबा राहिला आहे. परिणामी संघटनात्मक बांधणी, माजी खासदार राहिलेल्या किरीटजींचे काम आणि देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाच बसवण्याचा मतदारांनी केलेला निर्धार यामुळे या वेळीही आमचा विजय निश्चित आहे.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language