Ad will apear here
Next
महाराष्ट्रासह हरियाणात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक


नवी दिल्ली :
महाराष्ट्रासह हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा  केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आज (२१ सप्टेंबर) जाहीर केल्या आहेत. या दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून, २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच नवे सरकार सत्तेवर येणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने दोन्ही राज्यांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. २९ ऑक्टोबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच, ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारेच निवडणुका होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज १२ वाजता पत्रकार परिषदेत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी निवडणूक होणार असून, निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. चार ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, पाच ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सात ऑक्टोबरपर्यंत आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून, २४ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 

महाराष्ट्र विधानसभेची मुदत नऊ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असून, हरियाणा विधानसभेची मुदत दोन नोव्हेंबरला संपत आहे. हरियाणात ९० जागांसाठी, तर महाराष्ट्रात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. 

महाराष्ट्रातील २८८पैकी २९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी, तर २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. हरियाणातील ९० मतदारसंघांपैकी १७ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. 

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१९ रोजी दुसरी सुधारित मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात आठ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार आहेत. महाराष्ट्रातील मतदारयादीत ९६.४४ टक्के मतदारांचे फोटो समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्रातील ९६.८१ टक्के मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्रे देण्यात आली आहेत. हरियाणात या दोन्ही बाबींचे प्रमाण १०० टक्के आहे. 

महाराष्ट्रातील मतदान केंद्रे : ९५ हजार ४७३ (२०१४मधील संख्या ९० हजार ४०३) 
महाराष्ट्रातील ईव्हीएमची संख्या : एक लाख ८० हजार
व्हीव्हीपॅटची संख्या : एक लाख ३९ हजार 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi