Ad will apear here
Next
परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेऊन गांधी जयंती साजरी


सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील नरखेड (ता. मोहोळ) येथील मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाने घर, अंगण व परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेऊन गांधी जयंती साजरी केली. या मंडळातील ‘दुर्गां’नी हातात झाडू घेऊन परिसराच्या स्वच्छतेला प्रारंभ केला. 

प्रारंभी नंदा मोटे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शरयू थोरात यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ‘पर्यावरणपूरक सण-समारंभ साजरे करावेत, जेणेकरून पर्यावरणाला नुकसान पोहोचणार नाही. याची काळजी सर्वांनी घेण्याची गरज आहे,’ असे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. आपले गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्पही या महिलांनी केला. 

या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेश दांडगे, ग्रामपंचायत सदस्य विजय मोटे, शरयू थोरात, सरिता दांडगे, राधा कुंभार, रोहिणी मोटे, वंदना मोटे, सुवर्णा मोटे, सुनीता सोनार, शोभा झाडे, रतन झाडे, रूपाली मोटे, बाळासाहेब मोटे, आबा गायकवाड आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi