Ad will apear here
Next
हेलन फिल्डिंग
लंडनमध्ये एकट्या राहणाऱ्या ब्रिजिट जोन्सच्या आयुष्यात एका वर्षात काय काय घडतं त्याचं मजेदार वर्णन आपल्या धमाल कादंबरीतून करणाऱ्या हेलन फिल्डिंगचा १९ फेब्रुवारी रोजी जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...
..................
१९ फेब्रुवारी १९५८ रोजी यॉर्कशरमध्ये जन्मलेली हेलन फिल्डिंग ही कादंबरीकार आणि पटकथाकार म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुवातीच्या काळात तिने ‘बीबीसी’च्या ‘नेशनवाइड’साठी आणि ‘दी टेलिग्राफ’, ‘दी संडे टाइम्स’, ‘दी इंडीपेंडंट’ यांसारख्या प्रख्यात वृत्तपत्रांसाठी काम केलं होतं. त्यानंतर मात्र ती कादंबरीलेखनाकडे वळली. तिने स्त्रीकेंद्रित कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली ती ‘कॉझ सेलेब’पासून! 

मात्र तिला प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळाली ती ‘दी इंडिपेंडंट’मधल्या तिच्या एका स्तंभलेखनामुळे ज्याचं पुढे ‘ब्रिजिट जोन्स डायरी’ नावाच्या कादंबरीत रूपांतर झालं! त्यावर आधारित रेने झिल्वेगर, ह्यू ग्रांट आणि कॉलीन फर्थचा सिनेमाही तुफान गाजला होता. ब्रिजिट जोन्स नावाच्या लंडनमध्ये एकट्या राहणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यात एका वर्षात काय काय घडतं... प्रेमप्रकरणं... कुटुंब, मित्र.. करिअर.. तिचा जाडेपणा... दारू, सिगारेट्स वगैरे बाबतीत... ते तिच्या डायरीतून आपल्यासमोर येतं. याच व्यक्तिरेखेवर हेलनने पुढे ‘ब्रिजिट जोन्स : दी ईज ऑफ रीझन’ आणि ‘ब्रिजिट जोन्स : मॅड अबाउट दी बॉय’ असे दोन भाग लिहिले. आणि तेही लोकप्रिय झाले. तिच्या या पुस्तकांचा दीड कोटीहून अधिक खप झाला आहे. 

याव्यतिरिक्त हेलनचा ‘ऑक्स टेल्स’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि तोही गाजला. तिचं ‘ऑलिव्हिया ज्युल्स अँड दी ओव्हर अॅक्टिव्ह इमॅजिनेशन’ हे पुस्तकही लोकप्रिय आहे. 

वुडहाउसच्या स्मरणार्थ विनोदी लेखनासाठी सुरू केलेला ‘बोलिंजर एव्हरीमॅन्स वुडहाउस पुरस्कार’ तिला तिच्या ‘ब्रिजिट जोन्स बेबी : दी डायरीज’साठी मिळाला आहे. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language