Ad will apear here
Next
नागपूरमध्ये हिलटॉपच्या राजाची मूर्ती यंदा राज्यात सर्वांत उंच; १५ सप्टेंबरला विसर्जन
नागपूर : नागपूर येथील हिलटॉपचा राजा श्री गणेशासह लालबाग येथून आणलेल्या सात आकर्षक गणेशमूर्तींचे विसर्जन रविवारी, १५ सप्टेंबर रोजी फुटाळा तलावात होणार आहे. एकता गणेश उत्सव मंडळाचे मुख्य संयोजक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी ही माहिती दिली. हिलटॉपचा राजा यंदा १५१ फूट उंच अशा रायगड किल्ल्याच्या प्रतिकृती असलेल्या मंदिरात बसवण्यात आला असून, शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असलेली ही श्री गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात सर्वांत उंच असल्याचा दावा गजभिये यांनी केला आहे. 

मुंबईतील लालबाग येथून आणलेल्या आकर्षक गणेशमूर्तींमध्ये विष्णू रूपातील, माता स्वरस्वती रूपातील, नाग रूपातील, ब्रह्मा-विष्णू-महेश रूपातील, शंकर भगवान रूपातील, तसेच वाघावर स्वार असलेल्या आणि उंदरावर स्वार असलेल्या गणेशमूर्तीचा समावेश आहे, अशी माहिती गजभिये यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी गृहमंत्री आमदार जयंत पाटील, अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रसिद्ध प्रबोधनकार अमोल मिटकरी, गायक आनंद शिंदे, ‘रिपाइं’चे नेते मनोज संसारे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी आणि मान्यवरांनी एकता गणेश उत्सव मंडळाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील श्री गणेश व अन्य मूर्तींचे दर्शन घेतले.

दर वर्षीप्रमाणे यंदाही हिलटॉप येथून मोठी विसर्जन मिरवणूक निघणार असून, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ती सुरू होणार आहे. ही मिरवणूक अंदाजे दोन किलोमीटर लांब असेल. मिरवणुकीत घोडे, उंट, चालते ऑर्केस्ट्रा, लावणी नृत्य, चाळीसगाव बँड, संदल, प्रबोधनात्मक झांकिया आदी गोष्टींचा समावेश असेल. गणेशमूर्ती विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर महाआरती झाल्यानंतर विसर्जन होईल, अशी माहिती गजभिये यांनी दिली. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi