Ad will apear here
Next
उद्धवसाहेबांच्या भाषणात बाळासाहेबांसारखे तेज; सोशल मीडियावर प्रतिक्रिया...
मराठीजनांच्या आणि शिवसैनिकांच्या मनात अंगार जागृत करणारा हाच ‘बाळासाहेबांचा आवाज’ काल, गुरुवारी गोरेगावमधील मेळाव्यात घुमला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून उपस्थितांनी तो अनुभवला. ‘बाळासाहेब परत या’ म्हणणारे आता ‘बाळासाहेब परत आले’ असे म्हणू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या आवेशपूर्ण भाषणानंतर “आज पहिल्यांदा उद्धवसाहेबांच्या भाषणात बाळासाहेबांसारखे तेज पाहायला मिळाले”, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.
मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेना पदाधिकारी, विभाग आणि गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, गटप्रमुखांच्या मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक आणि आवेशपूर्ण शैलीत भाषण केले. शिवसैनिकांकडून, जनतेकडून त्यांनी ‘वचन’ मागून भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली. या भाषणानंतर सोशल मीडियावरही उद्धव ठाकरे यांचीच चर्चा होती. ”साहेब तुमचे भाषण ऐकले, आज तुमच्या मुखातून प्रत्यक्ष मोठे साहेबच बोलल्याचा भास झाला. भाषण ऐकताना आनंदाश्रू आले.”, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language