Ad will apear here
Next
रोपळे परिसरातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध
सेंद्रिय कर्ब तपासण्याची सुविधा असलेले आकृती केंद्र सुरू


सोलापूर :
पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक या गावातील आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब अगदी स्वस्तात स्वतःच तपासता येणार आहे. पीएम रोपळे आकृती केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध होणार असून, या केंद्राचे उद्घाटन १६ एप्रिल रोजी झाले.

या केंद्रामध्ये पाणी शुद्धीकरण संयंत्र आणि माती परीक्षणासाठी माफक किंमतीत किटही उपलब्ध करण्यात आली आहेत. उद्योजक परमेश्वर माळी यांच्या पीएम रोपळे टेक्नोकन्सल्टंट्स (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. भविष्यात या केंद्रात फोल्डेबल सोलार ड्रायरही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे माळी यांनी सांगितले.

‘या तंत्रज्ञानामुळे रोपळे गावच्या विकासाला निश्चितच गती मिळेल,’ असे प्रतिपादन केंद्र सरकारमधील सचिव, तसेच अणुऊर्जा, भ-विज्ञान आणि अवकाश आयोगाच्या सदस्या डॉ. सुधा कृष्णन यांनी केले. त्यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन १६ एप्रिल २०१९ रोजी पार पडले. 

भाभा अणु संशोधन केंद्रांतर्गत असलेल्या आकृती केंद्राच्या प्रमुख डॉ. स्मिता मुळे यांनी आकृती, कृती आणि फोर्स म्हणजे नेमके काय, हे सांगून सेंटरबद्द सविस्तर माहिती दिली. परमेश्वर माळी यांनी मान्यवरांचे स्वागत करून, रोपळेकरांची साथ फारच मोलाची असल्याचे सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निशिगंधा माळी यांनी गावच्या विकासासाठी भाभा अणु संशोधन केंद्राचे तंत्रज्ञान परमेश्वर माळी यांनी गावात आणल्याचे सांगितले. 

‘स्वेरी’चे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञानाशिवाय विकास अशक्य असल्याचे सांगून, ‘परमेश्वर माळी यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाला स्वेरी पूर्ण सहकार्य करील,’ असे सांगितले. 

या वेळी केंद्र सरकारच्या ‘स्किल इंडिया’चे सचिव डॉ. के. पी. कृष्णन, डॉ. अजय शहा, संतोष हलकुडे, सरपंच दिनकर कदम, ‘स्वेरी’चे विश्वस्त प्रा. सूरज रोंगे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, आउटरीच सेंटरचे गजेंद्र कुलकर्णी, संशोधन अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, विलास (ल.) भोसले, पल्लवी माळी, निवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ, पोपट भोसले, बाळासाहेब भोसले, रयत शिक्षण संस्थेचे बाळासाहेब पाटील, कार्यकारी अधिकारी समाधान लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. व्ही. एस. क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर सरपंच दिनकर कदम यांनी आभार मानले.

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language