Ad will apear here
Next
‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा मोहिमेच्या छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात
राजा रविवर्मा कलादालनात आयोजन; २२ सप्टेंबरपर्यंत पाहता येणार

पुणे : गिरिप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी १५ मे २०१९ रोजी माउंट कांचनजुंगावर केलेल्या यशस्वी चढाईदरम्यानची निसर्गाची विविध रूपे, गिर्यारोहकांचा चित्तथरारक प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना अनुभवता येणार आहे. या मोहिमेच्या चित्तथरारक प्रवासाच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ सप्टेंबर रोजी पुण्यात करण्यात आले. लडाख येथील ५५५ किलोमीटर्स लांबीची ‘ला अल्ट्रा’ मॅरेथॉन पाच दिवसांत पूर्ण करणारे आशिष कासोदेकर व एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण करकरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन २२ सप्टेंबरपर्यंत घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात पाहता येणार आहे. 


‘छायाचित्रांसोबतच गिर्यारोहकांनी वापरलेली अवजारे, बेसकॅम्पवर मुक्कामासाठी लावण्यात येणारे तंबू, टॉयलेट तंबू प्रत्यक्ष पाहायला मिळणार असून, गिर्यारोहण मोहिमेदरम्यान लागणारे साहित्य प्रतिकृती स्वरूपात प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. तर व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या (व्ही आर) माध्यमातून आठ हजार मीटरहून अधिक उंचीवरून येणारा अनुभव रसिकांना घेता येणार आहे,’ असे गिरिप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे व आनंद पाळंदे यांनी सांगितले.

प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीकृष्ण करकरे व आशिष कासोदेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी गिरिप्रेमी संस्थेचे प्रमुख उमेश झिरपे, उष:प्रभा पागे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटक कासोदेकर हे ला अल्ट्रा स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणारे पहिले भारतीय आहेत. करकरे हे एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असून, साहसप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. शिखर चढाई केलेले गिर्यारोहक उपस्थितांशी संवाददेखील साधणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले व विनामूल्य आहे, असेही उमेश झिरपे यांनी सांगितले. 

(या प्रदर्शनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत..)



 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi