Ad will apear here
Next
... आणि ओमानमध्ये फुलली ‘‘पुलं’ची हास्यनगरी’
हास्याच्या वर्षावात रसिक चिंब


पुणे :
आखाती देश म्हणजे वाळवंटी प्रदेश; पण या वाळवंटी प्रदेशात नुकताच हास्याचा वर्षाव झाला आणि रसिक त्यात चिंब न्हाऊन निघाले. निमित्त होते ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे. ओमानमधील दोफारची राजधानी सलालाह येथील मराठी मंडळाने ‘‘पुलं’ची हास्यनगरी’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. पुण्यातील कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला सलालाहमधील मराठी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जगभरात ठिकठिकाणी ग्लोबल पुलोत्सव साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओमानमधील सलालाह येथे २० सप्टेंबरला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील ‘आम्ही एकपात्री’ या संस्थेचे कलाकार संतोष चोरडिया, वंदन नगरकर, महेंद्र गणपुले, डॉ. कविता घिया, अनुपमा खरे यांनी हा कार्यक्रम सादर करून सलालाहमधील मराठी रसिकांची मने जिंकली आणि मराठीची ध्वजा दिमाखाने फडकावली. 



भन्नाट गाणी, एकपात्री सादरीकरणे, विनोदी किस्से, दृकश्राव्य, नाट्यमय निवेदन या माध्यमातून हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या कार्यक्रमाचे लेखन संतोष चोरडिया, डॉ. कविता घिया यांचे असून, संकल्पना, दिग्दर्शन संतोष चोरडिया यांचे होते. ‘सलालाहमध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला,’ अशी प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली. इंडियन स्कूलचे प्राचार्य दीपक पाटणकर यांच्या हस्ते या कलाकारांचा सन्मानचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप सुरडकर, श्रीकांत उमाळे, संजय पाटील, सुदाम टेमगिरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. डॉ. वीणा खर्डेनवीस यांनी स्वागत केले. डॉ. दिलीप सुरडकर यांनी प्रास्तविक केले. डॉ. सतीश घुगे यांनी महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्त बांधवांसाठी मदत  उभे करण्याचे आवाहन केले आणि हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे जाहीर केले. 

दुबई येथील मुख्य आयोजक रवींद्र काळे यांनी या ‘ग्लोबल पुलोत्सवा’मागची भूमिका मांडली आणि येत्या काही दिवसांतच हा कार्यक्रम सोहार, दुबई, मस्कत, अबुधाबी या ठिकाणी आयोजित करणार असल्याचे जाहीर केले. 

या कार्यक्रमासाठी डॉ. सतीश देसाई, सचिन ईटकर यांचे विशेष सहकार्य लाभले. सुभाष माकोने, गोपाळ कोरान्ने, योगेश पाटील, सुरेश सोनावणे, सचिन ठकार, ओंकार जोशी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. डॉ. राहुल देहेडकर यांनी आभार मानले. 

(‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्त ‘बुकगंगा डॉट कॉम’ने त्यांची सर्व पुस्तके आणि ई-बुक्स सवलतीत उपलब्ध केली आहेत. खरेदीसाठी येथे क्लिक करा.)

(कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत..)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi