Ad will apear here
Next
चंद्रकांत पाटील यांनी मानले सर्व यंत्रणांचे आभार

मुंबई : पुराचे पाणी रुळांवर आल्याने मुंबई ते कोल्हापूर जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणी बदलापूर-वांगणी दरम्यान अडकली होती त्यात तब्बल बाराशे प्रवासी प्रवास करत होते; मात्र महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी वेळीच युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे व वांगणी येथील ग्रामस्थांचे राज्याचे महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आभार व्यक्त केले आहे. 

याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘मध्य रेल्वेकडून महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बाराशे प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली. तात्काळ सर्व यंत्रणांना घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या सर्व बाराशे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापनची टीम, ‘एनडीआरएफ’, नेव्ही, रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी युद्धपातळीवर कार्य केले. नौसेना आणि ‘एनडीआरएफ’ टीम प्रमुख यांना राज्य सरकारने मदतीसाठी संपर्क करताच या यंत्रणांनी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावली. नेव्हीचे पाणबुडे अशी संपूर्ण यंत्रणा बचावकार्यात लागली होती.’ 

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेत संपूर्ण यंत्रणांना तत्काळ बचावकार्य करण्याचे आदेश दिले होते. ‘एनडीआरएफ’च्या सहा बोटी सकाळी नऊ वाजल्यापासून बचावकार्याला लागल्या होत्या. त्यांच्यासह स्थानिक पोलीस प्रशासन कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार हेही बचावकार्यात घटनास्थळी हजर होते. त्यानंतर नौदल आणि वायूदलालाही पाचारण करण्यात आले होते. वायू दलातील हेलिकॉप्टरने नऊ जणांना ठाणे येथे सुरक्षित स्थळी पोचविण्यात आले. सकाळी १०.०५ वाजता सात लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ११.५० ११७ लोकांना बाहेर काढण्यात आले. दुपारी एकच्या दरम्यान ५०० लोकांची सुटका यामधून करण्यात आली. या रेल्वेमध्ये बाराशेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी नऊ या गर्भवती महिला होत्या. त्यांनाही वेळेत उपचार देऊन सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. या ठिकाणी ३७ डॉक्टरांचा चमू, तसेच रुग्णवाहिका, औषध उपचार याचीही सोय करण्यात आली होती. ४० बसेस आणि  टेम्पो यांच्या साह्याने बदलापूर येथे प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात येत होते,’ अशी माहिती पाटील यांनी दिली आणि या सर्व यंत्रणांचे आभार व्यक्त केले आहेत.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi