Ad will apear here
Next
मी सरकारी डॉक्टर
‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना आता मोडीत निघत असून, डॉक्टर व रुग्णाचे नाते हे आता व्यावसायिक होऊ लागले आहे. यातून डॉक्टरांवर अविश्वास दाखविणे, मारहाण, हल्ले असे प्रसंग घडतात. अनेकदा डॉक्टरांचाही हलगर्जीपणा दिसून येतो. सरकारी दवाखाने, रुग्णालयांमध्ये अशा घटना जास्त घडतात. डॉ. कुमार ननावरे यांनी ३३ वर्षांच्या सरकारी सेवेतील अनुभव, कथा आणि व्यथा ‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकातून मांडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात त्वचारोगतज्ज्ञ म्हणून ‘वर्ग-१’च्या पदावर ते रुजू झाल्यानंतर महिन्याभरातच जैतापूर प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू झाले. या काळात डॉक्टरांवर ओढवलेला जीवघेणा प्रसंग यात आहे. डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचे रुग्णाच्या नातेवाईकांचे प्रयत्न व त्यातून डॉक्टरांमागे लागलेला चौकशीचा ससेमिरा याबद्दल यात लिहिले आहे, समाजातील दादा लोकांच्या डॉक्टरांवर असलेल्या दबावाबद्दल सांगताना ‘सीपीआर’चे डॉक्टर कोथुळे व त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची घटना त्यांनी कथन केली आहे. असे काही अनुभव सांगतानाच ग्रामीण रुग्णालयांची अवस्था, राजकीय नेत्यांची भूमिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वर्तन आदींवरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

पुस्तक : मी सरकारी डॉक्टर
लेखक : डॉ. कुमार ननावरे
प्रकाशक : आशा कुमार ननावरे
पृष्ठे : २२४
मूल्य : २०० रुपये

(‘मी सरकारी डॉक्टर’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language