Ad will apear here
Next
हिमायतनगरमध्ये १५ ऑगस्टला मोफत रोगनिदान शिबिर
हिमायतनगर : माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी हिमायतनगरमधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात रोगनिदानाच्या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला सदावर्ते यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे, तसेच हुतात्मा जयवंतराव पाटील शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होणाऱ्या रोगनिदान शिबिरात सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात नेत्र तपासणीसह मधुमेह, रक्तदाब, कर्करोग (मुख, स्तन, गर्भाशय) चिकित्सा केली जाणार आहे. गरजेनुसार चष्मे व औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.अशी माहिती हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला सदावर्ते यांनी दिली आहे.

(सूर्यकांता पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language