Ad will apear here
Next
शिरोळेंकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा


पुणे : लोकसभा मतदारसंघात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या आत्तापर्यंत झालेल्या अंमलबजावणीचा विस्तृत अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश खासदार अनिल शिरोळे यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे जीएम यू. व्ही. म्हस्के यांना दिले आहेत.

जन धन, स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, जीवन ज्योती, अटल पेन्शन, सुरक्षा बिमा या केंद्र सरकारच्या विविध योजनांची पुणे लोकसभा मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खासदार शिरोळे यांनी या योजनांसाठीची लीड बॅंक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे जीएम म्हस्के यांची भेट घेतली.

या योजनांच्या अंमलबजावणीच्या आढाव्यासंबंधी १८ एप्रिल २०१८ रोजी खासदार शिरोळे यांनी सर्व संबंधित बँक अधिकाऱ्यांची एक बैठक देखील घेतली होती. या बैठकीत या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंबंधी विस्तृत चर्चा झाली होती. त्याचाच पुढील टप्पा म्हणून शिरोळे यांनी म्हस्के यांची भेट घेऊन पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघानुसार अंमलबजावणीसंबंधी एक सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

हा अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्यासाठी परत एकदा सर्व बँक अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेणार असल्याचे खासदार शिरोळे यांनी या वेळी सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language