Ad will apear here
Next
प्रा. अर्चना प्रभुदेसाई यांना डॉक्टरेट प्रदान
ठाणे : येथील विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील विद्यार्थिप्रिय, आदर्श प्राध्यापिका अर्चना प्रभुदेसाई यांना मुंबई विद्यापीठातर्फे नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली. 

प्रा. प्रभुदेसाई यांनी एमकॉम, एमफिल, एमबीए (मार्केटिंग), सेट, बीएड आदी अनेक पदव्या मिळवल्या आहेत. या यशस्वी वाटचालीनंतर त्यांनी डॉ. प्रा. किशोरी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्राहकांच्या ज्ञानेंद्रियांचा त्यांच्या नॉन ड्युरेबल (अल्पायुषी) वस्तूंच्या खरेदी निर्णयावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास (ठाणे जिल्ह्याअंतर्गत)’ या विषयावर गेली पाच वर्षे अत्यंत चिकाटीने संशोधन केले. या त्यांच्या सखोल आणि नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

या वेळी बोलताना प्रा. प्रभुदेसाई म्हणाल्या, ‘आजचा दिवस माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, माझ्या यशाचे श्रेय माझ्या कुटुंबीयांना, माझ्या महाविद्यालयाला, तसेच संशोधनासाठी सतत प्रोत्साहन देणारे डॉ. विजय बेडेकर आणि सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करणाऱ्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांना आहे.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language