Ad will apear here
Next
सामाजिक कार्यामध्ये एकजूट दाखवावी
श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात तलाठी दत्तात्रय पुणेकर यांचे आवाहन


हिमायतनगर :
‘नाभिक समाजातील अनेक जण अजूनही अत्यंत हलाखीमध्ये जीवन जगत आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी समाजातील नवतरुणांनी पुढाकार घ्यावा. सामाजिक कार्यामध्ये एकजूट दाखवून समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा, तरच समस्या सुटू शकतील’ असे प्रतिपादन तलाठी दत्तात्रेय पुणेकर यांनी केले.
 
नाभिक समाजाचे दैवत असलेल्या श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात १४ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी राजकुमार पिंचा, नरसय्या गंधम, नाभिक महामंडळाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे, तालुकाध्यक्ष गजानन चायल, युवा अध्यक्ष राजू सुरजवाड आदींची उपस्थिती होती. 

सुरुवातीला श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परमेश्वर शिंदे, व्यंकटी गंधम, पप्पू सोळंके, मंगेश शिंदे, ज्ञानेश्वर सोळंके, रामदास लिंगमपल्ले, तुकाराम लिंगमपल्ले, भास्कर गंधम, रवी घुंगरे, वैभव घुंगरे, बाबुराव सोळंके, अवधूत गायकवाड, सोनू गायकवाड, चंद्रकांत कळसे, आनंदराव आहेरकर, रमेश लिंगमपल्ले, रवी जोन्नपल्ले, बाळू घुंगरे, प्रकाश घुंगरे, मारोती जोन्नपल्ले, यशवंत तेलंगे, लक्ष्मण मुटठेवाड, प्रल्हाद जोन्नपल्ले, नितीन शिंदे, बालाजी शिंदे, साहेबराव शिंदे आदींसह नाभिक समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वाघमबरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजू सुरजवाड यांनी मानले. उपस्थितांना प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाचा समारोप झाला. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi