Ad will apear here
Next
महायुतीला २२०पेक्षा अधिक जागा मिळतील; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास


मुंबई :
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप महायुतीला विधानसभा निवडणुकीत २२०पेक्षा अधिक जागा मिळतील,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. या पत्रकार परिषदेला राज्याच्या प्रभारी आणि राष्ट्रीय महामंत्री सरोज पांडे, प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, सरचिटणीस आणि महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर, माध्यम विभागप्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशोब मतदारांना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. या यात्रेला राज्यातील जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या यात्रेने विधानसभेच्या १४२ मतदारसंघांतून ३९९९ किलोमीटर प्रवास केला. यात्रेत झालेल्या सभांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजप महायुती विधानसभा निवडणुकीत २२०पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे.’

‘राज्य सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशोब या यात्रेत मतदारांपुढे ठेवण्यात आला. राज्य सरकारच्या कारभाराबाबत सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. या यात्रेत १६०पेक्षा अधिक जाहीर सभा झाल्या. या यात्रेला विशेषतः महिला आणि मुस्लिम समाजाकडून मोठा पाठिंबा मिळाला. औरंगाबाद, पुणे, इचलकरंजी येथे झालेल्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विदर्भ, मराठवाड्यातून यात्रा जात असताना पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सुमारे साडे तीन कोटीएवढे अर्थसाह्य प्राप्त झाले,’ अशी माहितीही पाटील यांनी दिली.   

‘भाजपच्या २० हजार शक्ती केंद्र प्रमुखांचे राज्यभर मेळावे घेण्यात येणार आहेत. २६ सप्टेंबरपासून हे मेळावे सुरू होतील आणि १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहतील,’ अशी माहितीही पाटील यांनी दिली.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi