Ad will apear here
Next
‘वारी विठ्ठलाची’मधून उलगडणार विठ्ठल भेटीचा प्रवास
मुंबई : वारीची प्रथा पुंडलिकानेच सुरू केली. पुंडलिकाचा हा ११ दिवसांचा वारीचा प्रवास पूर्ण होऊ नये म्हणून कलीने त्याच्या मार्गात बरेच अडथळे आणले. या अडथळ्यांवर मात करत पुंडलिकाने कसा हा खडतर प्रवास पूर्ण केला याची रोमहर्षक कथा ‘स्टार प्रवाह’च्या ‘वारी विठ्ठलाची’ या महामुव्हीमधून उलगडणार आहे. 

‘वारी विठ्ठलाची’ ही महामुव्ही रविवारी (२३ सप्टेंबर) दुपारी एक आणि सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाहवर’ दाखविली जाणार आहे. सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातला एक चमत्कारच आहे. दरवर्षी संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. विठूनामाचा गजर करत तल्लीन होऊन वैष्णव पायी पंढरपूरला जातात. वारीच्या या संपूर्ण प्रथेमागे खूप मोठा इतिहास आहे.

पुंडलिक हा विठुरायाचा लाडका भक्त. वारीची ही प्रथा पुंडलिकानेच सुरू केली; पण त्याचा हा प्रवास खूपच खडतर होता. पुंडलिकाचा हा ११ दिवसांचा वारीचा प्रवास पूर्ण होऊ नये म्हणून कलीने त्याच्या मार्गात बरेच अडथळे आणले. या अडथळ्यांवर पुंडलिकाने कशी मात केली, त्याची वारी पूर्ण झाली का, पुंडलिकाच्या या खडतर प्रवासात विठ्ठलाने त्याला साहाय्य केले का, या रोमहर्षक प्रवासाची गोष्ट ‘स्टार प्रवाह’च्या ‘वारी विठ्ठलाची’ या महामुव्हीमधून उलगडणार आहे.

त्याचप्रमाणे पुंडलिकाची वारी का सुरू झाली, डोक्यावर तुळस का घेतली जाते, गंधाचा टिळा का लावला जातो, रिंगणाचे खेळ का खेळतात, अशा वारीतल्या परंपरांमागील कारणेही या महामुव्हीतून कळणार आहेत.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language