Ad will apear here
Next
‘एकनाथ रानडे’ चित्रपटाच्या विशेष प्रयोगाने पुणेकर भारावले
पुणे : ‘कन्याकुमारी विवेकानंद शीला स्मारक’ आणि ‘विवेकानंद केंद्र’ या संस्थेचे प्रणेते एकनाथ रानडे यांच्या ध्येयवादी जीवनावर आधारित ‘एकनाथ : एक जीवन, एक ध्येय’ या चित्रपटाचा विशेष प्रयोग पुण्यात रविवारी झाला.

‘आयनॉक्स’मध्ये झालेल्या या प्रयोगाला पुणेकरांनी मोठी उपस्थिती दर्शविली. रानडे यांच्या जीवनकर्तृत्वाचा आणि समर्पित ध्येयवादाचा प्रवास चित्रपटातून उलगडला आणि उपस्थित भारावून गेले.

दिग्दर्शक सुदर्शन आरावमुघन, मनोज कृष्णन यांचा हा चित्रपट रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरात ४५ ठिकाणी दाखविला. या वेळी विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांतचे सहसंचालक किरण किर्तने यांनी चित्रपट निर्मितीमागची भूमिका सांगितली. रानडे यांच्यासोबत काम केलेले विनायक कानिटकर यांनी रानडे यांच्या कार्याचे अनुभव कथन केले.

चित्रपटाच्या प्रयोगासाठी दासबोधाचे अभ्यासक सुनील चिंचोळकर, ‘ज्ञानप्रबोधिनी’चे सुभाष देशपांडे, ‘ओमकार ट्रस्ट’चे श्री. सातवळेकर, विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांत निधी संकलक चिंतामण असनीकर, विवेकानंद केंद्राचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटक संध्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language