Ad will apear here
Next
निवडणूक काळात बँक व्यवहारांवर प्रशासनाची करडी नजर
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची माहिती


ठाणे :
निवडणुकीच्या काळात कोणताही आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील बँकांनी कोणत्याही खात्यामधील एक लाख रुपयांवरील, तसेच संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक खर्च कक्षाला दैनंदिन स्वरूपात देणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी म्हटले आहे.

२४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, जिल्ह्यातील सर्व बँकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले. बँकेची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनांमधून कोणत्याही परिस्थितीत बँकेशिवाय अन्य कोणत्याही त्रयस्थ संस्थेची, व्यक्तीची रोख रक्कम नेली जाणार नाही, याची बँकानी खात्री करून रोख रकमेच्या तपशीलासह बँकेची कागदपत्रे वाहनासोबत ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उप-निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, लीड बँकेसह इतर बँकांचे मॅनेजर, प्रतिनिधी उपस्थित होते.

राजेश नार्वेकरवेबसाइटवर माहिती उपलब्ध 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या बँकिंग व्यवहारांबाबत मार्गदर्शक सूचना आणि निर्बंध लागू केले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असून, सर्व बँकर्सनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उमेदवाराचे स्वतंत्र खाते उघडावे
बँकांनी त्यांच्याकडील खात्यामध्ये एक लाख रुपयांवरील अनियमित, संशयास्पद व्यवहार झाल्यास त्याची माहिती त्याच दिवशी जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षास कळवावी, याबरोबरच उमेदवारांचे निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतंत्र बँक खाते उघडणे गरजेचे असून, या कामी सर्व बँकांनी सहकार्य करावे, असे नार्वेकर यांनी सांगितले. या बँक खात्यासाठी आवश्यक असणारे चेकबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावे, तसेच उमेदवाराला १० हजार रुपयापर्यंतचे व्यवहार रोखीने, तर अधिक रकमेचे व्यवहार हस्तांतरणाद्वारे (आरटीजीएस/ एनईएफटी) करणे बंधनकारक आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. 

निवडणुकीच्या काळात सर्व बँकांनी स्वतंत्र अधिकाऱ्यांकडे हे काम सोपवावे, रोख रकमेच्या व्हॅनमध्ये असलेल्या एजन्सीच्या/कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एजन्सीने दिलेले ओळखपत्र नेहमी सोबत ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi