Ad will apear here
Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग चार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा चौथा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी विनायकराव अर्थात तात्याराव सावरकरांनी भारतमातेचे गुणगान करणारी एक अजरामर कविता रचली जी प्रत्येक भारतीयाला राष्ट्रभक्तीचे स्फुरण देते – ‘जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे...’

१९०५ साली ‘बीए’ची पदवी मिळवल्यावर, सावरकरांनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवावी आणि त्याचा वापर ब्रिटिश राजवटीविरुद्ध करावा, यासाठी लोकमान्य टिळकांनी देशभक्त श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे शिफारस केली. त्यानुसार लंडनसाठी वाफेच्या बोटीद्वारे प्रयाण होताच, कुशल नेतृत्व आणि संघटनकौशल्य अंगी बाणविलेल्या सावरकरांनी अनेक भारतीय विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याचे धडे दिले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. लंडनमध्ये ६५, क्रोमवेल अव्हेन्यू, हायगेट येथे इंडिया हाउस अर्थात भारत भवन या वास्तूमध्ये सावरकरांनी बॅरिस्टरीच्या अभ्यासाबरोबरीने ‘अभिनव भारत’ संस्थेचे कार्य छुप्या पद्धतीने सुरू केले. तिथेच ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखन करून सावरकरांनी ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून बाबाराव सावरकरांच्या मदतीने ते भारतात प्रसिद्ध केले. अवघ्या २० वर्षांचे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीची हत्या केल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांची साक्ष सावरकरांनी अमेरिकेत प्रसिद्ध करविली आणि ब्रिटिशांच्या क्रूर कारवायांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. 


लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा चौथा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या तिन्ही भागांच्या लिंक्स खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा पाचवा भाग २५ जून २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )


 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language