Ad will apear here
Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा

पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे शहर क्रीडा विभागातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात झाल्या. या स्पर्धेमध्ये पुणे शहरातील ३० महाविद्यालयातील ८१ कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. 

ग्रीको-रोमन व फ्रीस्टाइल या दोन्ही कुस्ती प्रकारातील लढती अटीतटीच्या झाल्या. प्रेक्षागृहातील प्रेक्षकांनी या कुस्त्यांना जल्लोषपूर्ण प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य  ललित लांडगे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव विकास रानडे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड, पुणे शहर क्रीडा परिषदेच्या सचिव मनीषा कोंढरे, सहसचिव प्रा. अजित परसे, उपाध्यक्ष रवी पाखरे, डॉ. आर. एम. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, क्रीडा संचालक भीमराव पाटील व महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. आभार डॉ. हर्षद जाधव यांनी मानले.  


या स्पर्धेत मुले व मुली या दोन्ही गटात संस्कार मंदिर महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंनी प्रभुत्व गाजविले. समारोपाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यशस्वी कुस्तीपटूंना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे पंच म्हणून मोहन खोपडे, मारुती सातव, रोहिदास आमले, चंद्रकांत मोहम्मद, रवी बोत्रे, संजय लोखंडे यांनी काम पाहिले. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language