Ad will apear here
Next
नवा महाराष्ट्र उभा करण्यास साथ द्या
चिपळूणमधील जनआशीर्वाद यात्रा व विजय संकल्प मेळाव्यात शिवसेना नेते सचिन अहिर यांचे आवाहन


चिपळूण :
‘युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नवा महाराष्ट्र घडवू पाहात आहेत. त्यासाठी ते युवक, शेतकरी व कामगार यांच्याशी संवाद साधत असून, उद्योग व कारखान्यांत स्थानिकांना शंभर टक्के रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे व शिवसेना यांच्या मागे उभे राहा,’ असे आवाहन शिवसेनेचे नेते व माजी आमदार सचिन अहीर यांनी कोकणवासीयांना केले.

रविवारी, १५ सप्टेंबर २०१९ रोजी चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. चिपळूणमध्ये शिवसैनिकांकडून यात्रेचे भव्य स्वागत झाले.त्या वेळी बोलताना अहिर म्हणाले, ‘कोकणातील प्रत्येक तालुक्यातील बेरोजगारांना काम मिळावे, अशी आदित्य ठाकरे यांची भूमिका आहे. त्यासाठी येथील कारखाने, उद्योग व एमआयडीसीमध्ये स्थानिकांनाच १०० टक्के नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका आदित्य ठाकरे व शिवसेनेने घेतली आहे. अशा नेत्याच्या मागे तुम्ही उभे राहिले पाहिजे.’



‘आदित्य ठाकरे यांना शेतीतले काय कळते, अशी टीका विरोधकांनी केली होती; पण आदित्य ठाकरे यांनी २०१४ नंतर राज्याच्या एका एका जिल्ह्यात तीन-तीन वेळा दौरे केले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व युवक-युवतींशी ते संवाद साधत आहेत,’ असे ते म्हणाले.

‘पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सरकारी मदतीपूर्वी शिवसेनेची मदत पोहोचली होती; आज तुम्हाला गाऱ्हाणे सांगायला मंत्री किंवा शासकीय अधिकारी मिळत नाहीत; पण शिवसेना नेतृत्व आज तुमच्या उंबऱ्यापर्यंत आले आहे. अशा नेत्यांच्या, अशा पक्षाच्या मागे तुम्ही उभे राहा आणि नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी साथ द्या,’ असे आवाहन सचिन अहिर यांनी केले.

‘कारखाने, उद्योग राज्यात आलेच पाहिजेत. त्यातून स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे; मात्र येथील पर्यावरणाला त्यामुळे धक्का पोहोचता कामा नये. विकास हा विनाशकारी असू नये. स्थानिकांची घरेदारे कायम राहिली पाहिजेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे,’ असेही अहिर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi