Ad will apear here
Next
पुण्यात भव्य पॉटरी महोत्सवाचे आयोजन

पुणे : ‘पॉटरी’ ही कला अत्यंत प्राचीन असून, मानवाचे हे पहिले नाविन्यपूर्ण संशोधन समजले जाते. कलासक्त पुणेकरांना ‘पुणे पॉटर्स मार्केट २०१९’ महोत्सवात या कलेतील अनोखे नमुने ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतीतून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. रुबी झुनझुनवाला, शालन डेरे, संदीप मंचेकर, खंजन दलाल, गौरी गांधी, शयोन्ती साळवी आदी दिग्गजांचा या महोत्सवात सहभाग असणार आहे. त्यांच्या दुर्मीळ व वैविध्यपूर्ण कलाकृती येथे प्रदर्शित होणार आहेत.

‘पुणे पॉटर्स मार्केट २०१९’ हा खास पॉटरी कलेचा महोत्सव पुण्यात शुक्रवार, सहा सप्टेंबर ते रविवार, आठ सप्टेंबर दरम्यान नगर रस्त्यावरील फिनिक्स मार्केट सिटी व शुक्रवार, १३ सप्टेंबर ते रविवार, १५ सप्टेंबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथे सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. ‘आयजीए गॅलेरीया’ यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.


वैविध्यपूर्ण माती कामाच्या, पॉटरीकामाच्या आकर्षक, रेखीव कलाकृती येथे जवळून बघता येणार आहेत. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या देशभरातील तज्ज्ञांशी बोलण्याची, त्यांच्या कलाकृती जवळून न्याहाळण्याची; तसेच कार्यशाळेद्वारा ही कला शिकण्याची संधीही पुणेकरांना यामुळे उपलब्ध होणार आहे.


महोत्सवाच्या संकल्पनेविषयी आयोजक व ‘आयजीए गॅलेरीया’चे संस्थापक इंद्रनील गराई म्हणाले, ‘हल्ली पॉटरीकलेचे नमुने हे जगात किंवा अगदी भारतातही शहरी संस्कृती म्हणून नव्याने ओळखले जाऊ लागले आहे. हे नमुने कलाकारांद्वारे निर्माण केले जात असल्याने सर्वसामान्यपणे सगळ्याच दुकानांमध्ये हे उपलब्ध नसतात. म्हणूनच या ‘पुणे पॉटर्स मार्केट २०१९’ महोत्सवातून या दुर्मीळ व एकमेवद्वितीय कलाकृती सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजात अभिजात कला प्रत्यक्ष बघून व अनुभवून त्याविषयी जागरूकता निर्माण करणे हे कलेचे अभ्यासक म्हणून आम्हाला आमचे कर्तव्य वाटते.’

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language