Ad will apear here
Next
यकृताच्या आजारांवरील उपचारांसाठी ‘रुबी’चा रेला इन्स्टिट्यूटशी सहयोग
डॉ. रेला इन्स्टिट्यूट अॅIट रूबी हॉल क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. जी. देशपांडे, डॉ. मनीषा करमरकर, डॉ. आर. बी. गुलाटी, डॉ. मोहमद रेला, डॉ. किशोर पुजारी,

पुणे : यकृताच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. रुबी हॉल क्लिनिकने यकृताच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटरशी सहयोग केला असून, डॉ. रेला इन्स्टिट्यूट अॅट रुबी हॉल क्लिनिकची स्थापना केली आहे. प्रख्यात यकृततज्ज्ञ व रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटरचे अध्यक्ष व संचालक डॉ. महंमद रेला यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन झाले.   

डॉ. रेला इन्स्टिट्यूट अॅट रूबी हॉल क्लिनिकमध्ये यकृताचे आजार, यकृत प्रत्यारोपण व स्वादुपिंडाशी निगडीत आजारांवर सर्वसमावेशक व बहुआयामी आरोग्यसेवा प्रदान केल्या जातील. यकृताच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक वेगळे ट्रान्सप्लान्ट इंटेसिव्ह केअर युनिट आहे.

रेला इन्स्टिट्यूट अ‍ँड मेडिकल सेंटरचे अध्यक्ष व संचालक डॉ. महंमद रेला यांना या क्षेत्रातील तीस वर्षांपेक्षा अधिक अनुभव असून, आतापर्यंत त्यांनी पाच हजारांहून अधिक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. 

या वेळी बोलताना डॉ. महंमद रेला म्हणाले, ‘यकृत आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना खऱ्या अर्थाने एका भागीदारीची गरज असते आणि ती भागीदारी त्यांची स्थिती जाणून घेणाऱ्या बहुआयामी तज्ज्ञांच्या टीमबरोबर होणे गरजेचे असते आणि नेमके हेच आम्ही घडवून आणतो. यकृत आजारांचे उपचार आणि प्रत्यारोपण यामध्ये भविष्यकाळात महाराष्ट्रात हे केंद्र एक्सलन्स सेंटर म्हणून ओळखले जावे हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी रुबी हॉल क्लिनिक यांच्याशी झालेला आमचा सहयोग हा योग्य आहे.’

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी म्हणाले, ‘हे केंद्र जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी असलेली आमची कटिबध्दता दर्शविते. या नवीन अद्ययावत केंद्रामध्ये रुग्णांना उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण सेवा पुरविल्या जातील. आमच्या येथील जगविख्यात यकृत शल्यविशारद, यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टस् व कर्करोगतज्ज्ञ समग्र निदान व उपचारासाठी एकत्रित काम करतात.’

रुबी हॉल क्लिनिकच्या यकृत प्रत्यारोपण शल्यविशारदांच्या गटामध्ये डॉ. मनोज श्रीवास्तव, डॉ. अनुजा आठले व डॉ. कमलेश बोकील, तसेच हेपॅटोलॉजिस्ट डॉ. विनित शहा, डॉ. नितीन पै, डॉ. श्रीकांत पोटे आणि डॉ. साहिल रसाने यांचा समावेश आहे. 

यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ व डॉ. रेला इन्स्टिट्यूट अॅट रुबी हॉल क्लिनिकचे प्रोग्राम इनचार्ज डॉ. मनोज श्रीवास्तव म्हणाले, ‘अनियंत्रित यकृताच्या आजारामुळे रुग्णांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो. लवकर निदान व आमच्या केंद्राद्वारे अद्ययावत उपचारांमुळे अनेक रुग्णांना लाभ मिळेल, आम्हाला खात्री आहे.’

रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्व स्त डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, ‘या सहयोगाद्वारे यकृताने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या आयुष्यावर एक सकारात्मक प्रभाव पडेल. कितीही गुंतागुंतीचा आजार असला, तरी त्यांना नवजीवन देण्यासाठी आमच्या टीमकडे प्रदीर्घ अनुभव असून, त्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत रुबी हॉल क्लिनिकने नवे मापदंड प्रस्थापित केले असून, हादेखील एक महत्त्वाचा टप्पा आहे.’

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘यकृताच्या आजारांचे अद्ययावत निदान व उपचार यामध्ये रुबी हॉल क्लिनिक नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. रेला इन्स्टिट्यूटशी आमचा सहयोग सध्या आमच्या येथे असलेल्या ऑर्गन ट्रान्सप्लान्ट सेंटरला पूरक ठरेल.’
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi