Ad will apear here
Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग ११
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा अकरावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
रत्नागिरीमध्ये भागोजीशेठ कीर यांच्या आर्थिक साह्याने सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली. प्रचलित रंग-वेश-वर्णभेद बाजूला सारून सर्व जातिभेदांना तिलांजली द्यावी, महिलांना समाजात उच्च स्थान मिळावं, सर्व समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी सहभोजनं व्हावीत, उपेक्षित समाजाला समान हक्क मिळावेत, दलित आणि दलितेतर यांच्यातील भेदभावाच्या भिंती पडून त्यांना एका झेंड्याखाली एकत्र आणावं, सर्व स्तरांतील लोकांना धर्मस्थळं, शिक्षण आणि सामाजिक संस्थांमध्ये समान अधिकार मिळावेत यांसारख्या विविध प्रबोधनात्मक विचारांनी प्रेरित होऊन रत्नागिरीत उभारलेले ‘पतित पावन मंदिर’ सर्व समाजाचे केंद्रस्थान ठरले. याबरोबरीनेच मातृभाषेचा आदर करून तिचा प्रसार आणि वापर अधिकाधिक ठिकाणी केला जावा, यासाठी शेकडो प्रचलित इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द बनवून ते सर्वसामान्य कामकाजात आणि बोलीभाषेत वापरले जावेत, या ‘भाषाशुद्धी’च्या कार्यासाठी सावरकरांनी अथक प्रयत्न केले. आजच्या काळात सहज वापरले जाणारे ‘दूरध्वनी’, ‘विधिमंडळ’, ‘क्रमांक’, ‘दिनांक’, ‘प्राचार्य’, ‘नगरपालिका’, ‘न्यायालय’ इत्यादी अनेक मराठी शब्द सावरकरांनी मराठी भाषेत रुजवून ती समृद्ध केली. १० मे १९३७ रोजी सावरकरांवरील सर्व सरकारी आणि राजकीय बंधने बाजूला केली गेली आणि काळ्या पाण्याच्या दोन शिक्षांतून ब्रिटिशांकडून त्यांची संपूर्ण मुक्तता झाली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत दौरे काढून ‘हिंदुत्व’ या केवळ धर्माशी संलग्न कल्पनेच्या पलीकडचा खरा अर्थ मांडण्याच्या उद्देशाने सावरकरांनी पूर्ण भारत पिंजून काढला. १९४४ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्याचे भाकीत करताना, तरुणांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सबळ भारतासाठी साहित्य आणि विज्ञानाबरोबरीनेच शस्त्रशक्तीचे शिक्षण घेण्याचा संदेश दिला. 

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा अकरावा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या दहाही भागांच्या लिंक्सही खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा शेवटचा म्हणजेच बारावा भाग १३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi
Select Language