Ad will apear here
Next
शरद पवार १७ सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर; सोलापुरातून सुरुवात
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १७ सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते सोलापूर येथून करणार आहेत.

१७ ते २२ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. यामध्ये सभांऐवजी ते पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेणार आहेत. सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या ठिकाणी ते बैठका घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राज्यव्यापी दौरा करत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी कळवले आहे.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi