Ad will apear here
Next
‘पीआयसी’तर्फे इस्रायली चित्रपट महोत्सवाचे आयोजन
अॅन इस्रायली लव्ह स्टोरीपुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरने (पीआयसी) सहा ते नऊ  डिसेंबर २०१८ या कालावधीत दरम्यान लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे इस्रायली चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीआयसी’तर्फे आयोजित हा सलग बारावा चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

शेजारील देशांतील चित्रपट आपल्या देशात दाखविले जावेत, त्यांची संस्कृती आपल्याला कळावी, त्याचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने ‘पीआयसी’ गेल्या काही वर्षांपासून चित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत आहे. या इस्रायली महोत्सवासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि मुंबईमधील इस्रायल दूतावास यांचे विशेष साहाय्य मिळाले आहे.

दी बॅंड्स व्हिजिटयाआधी ‘पीआयसी’च्या वतीने आयोजित केलेल्या महोत्सवादरम्यान बांगलादेश, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, इराण, नेपाळ, श्रीलंका आदी देशांतील चित्रपट दाखविण्यात आले होते. यावर्षी इस्रायलमधील परिस्थिती, समाजमन आणि नागरिकांशी संबंधित चित्रपट पाहायची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. यात मुख्यत: इस्रायल या तरुण राष्ट्राची कथा आणि व्यथा, आनंद आणि वेदना, वास्तविकता आणि स्वप्ने, स्थलांतर, धर्म आणि महिला या विषयांवर अंर्तमुख करणारा प्रवास पाहायला मिळणार आहे.  

जेलीफिशचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सहा डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता इस्रायलचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पटकथाकार डॅन वॉलमन यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्यांचा ‘अॅन इस्रायली लव्ह स्टोरी’ हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येईल. या वेळी इस्रायली दूतवासातील डेप्युटी काउन्सल जनरल निमरोद काल्मार, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘पीआयसी’च्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक हेदेखील उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर नऊ डिसेंबरपर्यंत महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

थर्स्टमहोत्सवामध्ये ‘यानाज् फ्रेंडस्’, ‘स्ट्रेंजर्स’, ‘दी बॅंड्स व्हिजिट’, ‘दी सिरीयन ब्राइड’, ‘लेमन ट्री’, ‘अॅन इस्रायली लव्ह स्टोरी’, ‘पासओव्हर फिव्हर’, ‘माय मायकल’ ‘फुटनोट’, ‘माय फादर, माय लॉर्ड’, ‘थर्स्ट’ या काही चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवादरम्यान दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांना महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकने आणि पारितोषिके मिळाली आहेत. याशिवाय महोत्सवातील काही चित्रपट हे इस्रायलतर्फे अधिकृतपणे ऑस्करमधील ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ स्पर्धा विभागात पाठविण्यात आले होते.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language