Ad will apear here
Next
राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार घोषित; ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संपादकांनाही पुरस्कार जाहीर
पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव; यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा २०१८ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार, तर बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार दैनिक सकाळचे हरी तुगावकर यांना जाहीर झाला आहे. सोशल मीडियासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार ‘बाइट्स ऑफ इंडिया डॉट कॉम’ या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलचे संपादक अनिकेत कोनकर यांना दिला जाणार आहे. 

अनिकेत कोनकरराज्य शासनामार्फत पत्रकार, छायाचित्रकार आदींना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ जुलै रोजी मुंबईत केली. शनिवार २७ जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी चार वाजता होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या समारंभात २०१६ आणि २०१७ या सालातील पत्रकारिता पुरस्कारांचे, तसेच महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१७ व २०१८ यातील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत.

विविध पुरस्कारांची यादी -

२०१८चे पुरस्कार -
लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार : ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत – एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार : ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, - ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र.

अन्य पुरस्कार (प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.)

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - हरी रामकृष्ण तुगावकर, दै. सकाळ

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - दिनेश गणपतराव मुडे, दै. लोकमत समाचार

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - मोहम्मद नकी मोहम्मद तकी, दै. वरक – ए - ताजा

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - महेश घनश्याम तिवारी, न्यूज १८ लोकमत

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - श्री. प्रशांत सोमनाथ खरोटे, दै. लोकमत

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) - अनिकेत बाळकृष्ण कोनकर, संपादक, www.bytesofindia.com

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - प्रवीण श्रीराम लोणकर, दै. महाराष्ट्र टाइम्स

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - विजय बाबूराव निपाणेकर, मुक्त पत्रकार (या पुरस्कारामध्ये शासनाच्या रकमेव्यतिरिक्त दै. गावकरीने १० हजार रुपये पुरस्कृत केले आहेत) 

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - संजय कृष्णा बापट, दै. लोकसत्ता

नानासाहेब परुळेकर पुरस्कार, पुणे विभाग  - मोहन मारुती मस्कर-पाटील, दै. पुण्यनगरी

शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - भगवान आत्माराम मंडलिक, दै. लोकसत्ता

ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - श्रीमती इंदुमती गणेश (सूर्यवंशी), दै. लोकमत

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - गोपाल जगन्नाथराव हागे, दै. सकाळ-ॲग्रोवन

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - योगेश प्रकाश पांडे, दै. लोकमत

डॉ. सुरेखा मुळे, चंद्रकांत पाटील यांना शासकीय गटातील पुरस्कार
माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) मंत्रालयातील विभागीय संपर्क अधिकारी डॉ. सुरेखा मधुकर मुळे यांना जाहीर करण्यात आला. छायाचित्रकारांना देण्यात येणारा शासकीय गटातील केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) अमरावती विभागीय माहिती कार्यालयातील चंद्रकांत आनंदराव पाटील यांना जाहीर करण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

२०१६ आणि २०१७मधील घोषित पत्रकारिता पुरस्कार
२७ जुलै २०१९ रोजी होणाऱ्या समारंभात २०१६ आणि २०१७मधील पत्रकारिता पुरस्कारांचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण होणार आहे. या पुरस्कारांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. या पुरस्कारांचा आणि विजेत्यांचा तपशील पुढीलप्रमाणे - 

२०१६साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना आणि २०१७चा पुरस्कार साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

इतर पुरस्कार -
५१ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

वर्ष २०१६ -
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - राजेश जोष्टे, दै. पुढारी, रत्नागिरी.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) - विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै. गोदावरी ऑब्झर्व्हर, नांदेड

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - कपिल श्यामकुंवर, प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव, छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई-सकाळ, कोल्हापूर

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरुण भारत, सातारा.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर (शासनाव्यतिरिक्त १० हजार रुपये दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक, दै. लोकमत, लातूर

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - मारुती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई

नानासाहेब परुळेकर पुरस्कार, पुणे विभाग - ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे

शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - माधव डोळे, ब्यूरो चीफ, दै. सामना, ठाणे

ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदुर्ग

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर

वर्ष २०१७ -
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) - लुमाकांत नलवडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) - मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) - राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) - खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) - कन्हैया खंडेलवाल, न्यूज १८ लोकमत, हिंगोली

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) - संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग - अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे - ५१ हजार रुपये (शासनाव्यतिरिक्त रुपये १० हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) - जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी, औरंगाबाद

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई

नानासाहेब परुळेकर पुरस्कार, पुणे विभाग - प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर

शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरुण भारत, रत्नागिरी

ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - अभिजित डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग - अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स, गोंदिया

वर्षा फडके-आंधळे, डॉ. किरण मोघे यांना शासकीय गटातील पुरस्कार
माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना दिला जाणारा शासकीय गटातील यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) (२०१६) मंत्रालयातील वरिष्ठ सहायक संचालक वर्षा फडके-आंधळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. २०१७साठीचा हा पुरस्कार जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

तसेच शासकीय गटातील छायाचित्रकारांना देण्यात येणारा केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) (२०१६) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील छायाचित्रकार प्रज्ञेश कांबळी यांना, तर २०१७साठीचा पुरस्कार अमरावती येथील छायाचित्रकार मनीष झिमटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा २०१६ 
प्रथम - आनंद पगारे (नाशिक)
द्वितीय - रोहित कांबळे (कोल्हापूर), 
तृतीय - शशिकांत सुतार (कोल्हापूर)
उत्तेजनार्थ - महेश ढाकणे (औरंगाबाद), किसन हासे (अहमदनगर), मिलिंद पानसरे (पुणे)

महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१७ 
प्रथम - वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर)
द्वितीय - दीपक कुंभार (कोल्हापूर)
 तृतीय - अंशुमन पोयरेकर (मुंबई)
उत्तेजनार्थ - प्रशांत खरोटे (नाशिक), राजेद्र धाराशिवकर (उस्मानाबाद), सुनील बोर्डे (बुलढाणा), उमेश निकम (पुणे), सुशील कदम (नवी मुंबई)

महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१८ 
प्रथम - आनंद बोरा (नाशिक)
द्वितीय - कृष्णा मासलकर (कोल्हापूर)
तृतीय - राहुल गुलाणे
उत्तेजनार्थ - सचिन वैद्य (मुंबई), वीरेंद्र धुरी (मुंबई), प्रशांत खरोटे (नाशिक), दीपक कुंभार (कोल्हापूर), गोपाल बोरकर (हिंगोली)
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi