Ad will apear here
Next
गीता निवृत्ती उतेकर यांना आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार प्रदान


अलिबाग :
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महाड तालुक्यातील नागाव बीटमधील प्रावीण्य मिळविलेल्या गीता निवृत्ती उतेकर यांना आदर्श पर्यवेक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अलिबाग येथील पीएनपी सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार, ‘शेकाप’चे नेते जयंत पाटील आणि लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आस्वाद पाटील, आमदार धैर्यशील पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती उमाताई मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभारी बालविकास अधिकारी प्रकल्प महाड येथील शुभांगी महाडिक, कर्जत तालुक्यातील पर्यवेक्षिका श्रीमती रंजना हळणकर व नागाव बीटमधील कोल गावठाण येथील अंगणवाडी सेविका सुनीता काते यांचाही या प्रसंगी सत्कार झाला.
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language