Ad will apear here
Next
भाजप माध्यम विभागाची १४ सप्टेंबरला कार्यशाळा
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश माध्यम विभागातर्फे शनिवारी, १४ सप्टेंबर रोजी दिवसभराची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे, प्रदेश निवडणूक प्रभारी व राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते त्यात मार्गदर्शन करणार आहेत. प्रदेश सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही माहिती दिली.

कार्यशाळेत उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदरा अतुल भातखळकर, भाजप राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनिल बलुनी, सहप्रभारी संजय मयुख, राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी मार्गदर्शन करणार आहेत.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, चर्चा प्रतिनिधी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख आणि सोशल मीडिया सेलचे संयोजक व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या माध्यमविषयक तयारीच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची असल्याचे पक्षातर्फे कळवण्यात आले आहे. 
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language