Ad will apear here
Next
‘कोल्हापुरात कुस्ती संकुल उभारावे’
राहुल आवारे याची मागणी
राहुल आवारेपुणे : ज्या कोल्हापूरात बाहेरून पैलवान तालीम करण्यासाठी यायचे, जिथून कुस्ती जगभरात पोहोचली, तेथील पैलवान आता सराव करण्यासाठी पुण्यात येतात, हे पाहून वाईट वाटतं. म्हणूनच राज्य सरकारने कोल्हापूर येथे कुस्ती संकुल उभारावं, अशी मागणी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा राहुल आवारे याने केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात तो बोलत होता.

‘पूर्वी बाहेरच्या गावांमधील पैलवान कोल्हापूरात तालीम करण्यासाठी जायचे, पण आता हे चित्र बदलले आहे. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या कोल्हापूरच्या मल्लांना सरावासाठी पुण्याला जावे लागते. कोल्हापुरातले नैसर्गिक वातावरण कुस्तीसाठी पोषक आहे; पण याबाबतीत कोल्हापूरकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. देशातील इतर राज्यांमध्ये मात्र सरकारकडून त्यांच्या भागातील कुस्ती खेळाडूंना अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या जातात. म्हणूनच ते खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होते. कोल्हापूरात सरकारने अत्याधुनिक सोयी सुविधांसह कुस्ती संकुल उभारावे, असे मला वाटते. तसे झाले तर मी आणि माझ्यासारखे अनेक खेळाडू तिथे सरावासाठी जातील. अनेक खेळाडू महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील,’ अशी भावना त्याने या वेळी व्यक्त केली.


‘मी गेली दहा वर्ष अनेक स्पर्धांमधून पदके जिंकली आहेत. आता मी ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत आहे. नुकत्याच कझाकीस्तान येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक हुकल्याची खंत कायम राहील; पण आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकायचे हेच माझे ध्येय आहे. नवीन येणाऱ्या खेळाडूंनादेखील मी हेच सांगेन, राजकारण कायमच राहणार आहे; पण आपण काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. राजकारणाकडे दुर्लक्ष करून पदक मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,’ असेही राहुलने आवर्जून नमूद केले.    
 
(पत्रकार संघातील वार्तालापात कुस्तीपटू राहूल आवारे याने  व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)     

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
Maharashtra Madhav Vidwans Karu Ya Deshatan Solapur Mahajanadesh Yatra Ratnagiri Nashik Girish Bapat Kolhapur Ahmadnagar Narendra Modi Nationalist Congress Party Internet India Satara USA Ganeshotsav 2019 New Delhi