Ad will apear here
Next
बोडखी
यांत्रिकी युगात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या बलुतेदार व्यवस्थेतील अगदी तळातील माणसांच्या जगण्याचे चित्रण प्रतिमा इंगोले यांनी ‘बोडखी’ या कादंबरीतून रंगवले आहे. डोमा नावाच्या चर्मकाराच्या संसाराची ही कहाणी आहे. त्याची कलाकुसरीने नटलेली टिकाऊ पादत्राणे पंचक्रोशीत प्रसिद्ध असली, तरी जगण्याची लढाई त्याला रोजच लढावी लागत होती. शेतकऱ्यांकडून बलुतं म्हणून जे काही मिळत असे त्यात तो आणि त्याची सुसंस्कारी पत्नी कौसल्या समाधान मानत असे. त्याची मुले प्रकाश आणि गोदावरी हीदेखील परिस्थितीने शहाणी झालेली होती. प्रकाशला शिकवण्याचे ध्येय डोमा ठेवतो; पण प्रकाशच्या मित्राच्या घरात झालेल्या सोनेचोरीचे संकट या ध्येयाच्या आड येते. प्रकाशवर आळ येऊ नये, म्हणून डोमा हे प्रकरण आपल्या अंगावर घेतो; पण प्रकाशने चोरी केलेली नसतेच. तरीही डोमा त्याची शिक्षा भोगतो. दुसरीकडे गावचा पाटील कौसल्यावर अत्याचार करतो. सारे घरच विस्कटते. तुरुंगातून सुटका झाल्यावर डोमाला वास्तवाची जाणीव होऊन तो मुंबईला जाण्याची यतयारी करतो. जीवनातील नाट्य व कारुण्य यात संवेदनशीलतेने टिपलेले आहे.

पुस्तक : बोडखी
लेखिका : डॉ. प्रतिमा इंगोले
प्रकाशन : सोनल प्रकाशन
पृष्ठे : ३०६
मूल्य : २५० रुपये

(‘बोडखी’ ही कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी, तसेच त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी लील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language