Ad will apear here
Next
क्विक हीलतर्फे नवीन अँटीव्हायरस दाखल
क्विक हीलचा नवीन अँटीव्हायरस दाखल करताना  कैलास काटकर आणि संजय काटकर

मुंबई : आयटी सुरक्षितता उपाययोजना पुरविणारी आघाडीची कंपनी क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडने लॅपटॉप आणि डेस्कटॉपकरिता ‘लाइटर स्मार्टर फास्टर’ हा नवा अँटीव्हायरस दाखल केला आहे. हे नवीन उत्पादन जागतिक पातळीवर झपाट्याने वाढत असलेल्या धोक्यांना सामोरे जाण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

२०१८ मध्ये डेस्कटॉप आणि लॅपटॉप्सवर ९७ कोटी ३० लाख मालवेअर धोके आढळल्याचे क्विक हीलने आपल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. 
क्विक हीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास काटकर म्हणाले, ‘लाइटर स्मार्टर फास्टर’ उत्पादनसंच हे ग्राहकांना नव्या सायबर   धोक्यांपासून सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने टाकलेले पुढचे पाऊल आहे. आमच्या विविध अत्याधुनिक सुरक्षा उपायांद्वारे नागरिकांना सर्वांत सुरक्षित डिजिटल अनुभवाची खात्री देण्यास आम्ही बांधील आहोत.’  
 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language