Ad will apear here
Next
राष्ट्रीय मूल्यशिक्षणामध्ये महाभारताचे योगदान
अगदी लहानपणी ज्या गोष्टी आपण ऐकतो, त्यातून मूल्यशिक्षणाचे बीज रुजते. शिवाजी महाराज लहान असताना त्यांना जिजाबाई रामायण-महाभारतातील गोष्टी सांगत. त्यातून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले, असे उदाहरण देऊन डॉ. अपर्णा जोशी यांनी ‘राष्ट्रीय मूल्यशिक्षणामध्ये महाभारताचे योगदान’ या पुस्तकामधून भारतीय राज्यघटनेतील जी दहा मूल्ये राष्ट्रीय मूल्ये म्हणून निश्चित केली आहेत, त्यांचा संस्कार शालेय मुलांवर करण्यासाठी महाभारताचा उपयोग केला आहे. महाभारतातील प्रसंग, कथा, व्यक्तिरेखांचे गुणदोष यातून मूल्यसंस्कार अधोरेखित केले आहेत. महाभारतातील कथा, राष्ट्रासंबंधी कल्पना, महाभारताचे स्वरूप, महत्त्व व त्यातील राष्ट्रीय मूल्यविचार, प्राची न व आधुनिक काळातील मूल्यशिक्षणाची पार्श्वभूमी, महाभारत आणि राष्ट्रीय मूल्यशिक्षण, वैयक्तिक आचरणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या महाभारतातील संकीर्ण कथा यात सांगितल्या आहेत.

पुस्तक : राष्ट्रीय मूल्यशिक्षणामध्ये महाभारताचे योगदान
लेखिका : डॉ. अपर्णा जोशी
प्रकाशन : अविरत प्रकाशन
पृष्ठे : २१६
मूल्य : २०० रुपये

(‘राष्ट्रीय मूल्यशिक्षणामध्ये महाभारताचे योगदान’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
आर्थिक लाइफस्टाइल स्त्री-शक्ती पुणे मुंबई तरुणाई व्यक्ती आणि वल्ली
Select Language